प्रती शिर्डी शिरगाव येथील साई स्वर हरिभजन मंडळाचा “साई अभंगवाणी’

शिर्डी : येथील मंदिरात अभंगवाणी सादर करताना प्रती शिर्डी शिरगाव येथील साई स्वर हरिभजन मंडळ.

सोमाटणे, (वार्ताहर) – श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव 2018 निमित्त प्रती शिर्डी शिरगाव येथील साई स्वर हरिभजन मंडळाचा “साई अभंगवाणी’ कार्यक्रम नुकताच शिर्डी साई समाधी मंदिरात झाला. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य रमेश भुजबळ, शरद जांभेकर यांचे शिष्य गणेश बुवा गोंधळी, राकेश मुगळे, सनई वादक कल्याण अप्पार, तबला वादक राजगोपाल गोसावी, पखवाज वादक उद्धव गोळे, हॉर्मोनिअम वादक शाळिग्राम खोसे, टाळ वादक प्रवीण केदारीसह गायक वैभव खांडेकर यांच्या सुमधुर अभंग वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्रोत्यांचा मोठ्या प्रमाणात परिसाद लाभला. कार्यक्रम प्रसंगी कलाकारांचा शिर्डी देवस्थान तर्फे सत्कार करण्यात आला.

प्रती शिर्डी शिरगाव देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे, विश्‍वस्त सचिव सपना लालचंदानी यांची प्रमुख उपस्थिती होती. अरुण बिराजदार, विकास पतंगे, धनंजय जाधव, सिद्धाजी माने विष्णू सानप, सत्यवान शिंदे, प्रमोद बिराजदार, शशिकांत वंजारी, प्रदीप देवळे, आकाश लगड आदीसह साई भक्‍त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभंगवाणीने सर्व शिर्डी परिसर मंत्रमुग्ध झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)