प्रतीक्षा संपली…! मुंबई-गोवा क्रूझ एप्रिलपासून होणार सुरु

मुंबईबहुप्रतिक्षीत मुंबई-गोवा क्रूझ सेवा आता लवकरच सुरु होणार आहे. येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ही सेवा सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीसाठी गोव्याला जाणाऱ्यांना प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. 

महाराष्ट्र आणि गोवादरम्यान जलवाहतुकीला चालना देण्यासाठी मुंबई-गोवा क्रूझ सेवा सुरु करण्यात येणार आहे. या वर्षीच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीपासूनच ही सेवा सुरु होणार होती, मात्र ती अजूनही सुरु झाली नाही. आता काही दिवसातच मुंबई-गोवा क्रूझ सेवा सुरु होणार आहे. महत्त्वासि म्हणजे या प्रवासासाठी एकावेळचे तिकीट एक ते दीड हजार इतके असेल.

सी ईगल ही कंपनी मुंबई-गोवा मार्गावर क्रूझ सेवा पुरवणार आहे. एक दिवसआड ही क्रूजसेवा असेल. या क्रूझमधून एकावेळी 200-250 प्रवासी प्रवास करु शकतात. उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने अनेकजण मुंबईहून गोव्याला जातात. त्यांच्यासाठी रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाचा पर्याय उपलब्ध होता. मात्र आता त्यांना समुद्रातून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)