प्रतिक बब्बर आणि सान्या सागर विवाहबद्ध

कॉंग्रेस नेते, अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा अभिनेता प्रतिक बब्बर आणि बसपा नेते पवन सागर यांची कन्या सान्या सागर यांचा विवाह काल लखनौमध्ये धुमधडाक्‍यात पार पडला. वधू आणि वर दोघेही जण राजकीय घराण्याशी संबंधित असल्यामुळे या विवाह समारंभाला राजकीय नेत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. बसपा प्रमुख मायावती, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, कॉंग्रेसचे सरकार असलेल्या पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक वरिष्ठ नेते या समारंभाला उपस्थित होते. मंगळवारी या जोडीचा मेहंदी समारंभही खूप गाजावाजात पार पडला होता.

आता मुंबईमध्ये या जोडीच्या विवाहाचा स्वागत समारंभ थाटामाटात होणार आहे. त्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. प्रतिक बब्बरने अनुभव सिन्हाच्या “मुल्क’मध्ये केलेली भूमिका विशेष लक्षात राहणारी होती. त्याशिवाय “जाने तू या जाने ना’ आणि “एक दीवाना था’ मध्येही त्याने काम केले आहे. सान्या आणि प्रतिकची ओळख 8 वर्षांपूर्वी झाली होती. मात्र गेल्या दोन वर्षांपूर्वीपासून त्यांचे डेटिंग सुरु झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)