प्रतिक बब्बरच्या कारची एकाला धडक 

राज बब्बरचा मुलगा प्रतिक बब्बरविरोधात गोव्यामध्ये एक अपघात झाला. बेदरकारपणे कार चालवणाऱ्या प्रतिक बब्बरने एका स्कूटर चालकाला धडक दिली. एवढेच नव्हे तर या स्कूटर चालकाला अर्वाच्य शिवीगाळही केली होती. त्यामुळे प्रतिक बब्बरच्या विरोधात गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पण प्रतिक बब्बरही काही कमी नाही. त्याने या स्कूटर चालकाच्या विरोधातच पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या स्कूटर चालकाने आपल्या कारची खिडकी फोडली, असा आरोप प्रतिकने केला.
पोलिसांनी प्रतिक बब्बरची मेडिकल तपासणी करायचे ठरवले आणि त्यासाठी त्याच्या रक्‍ताचे नमुने देण्याची मागणी केली. पण प्रतिकने त्यासाठी परवानगी नाकारली. त्यावरूनच प्रतिक कोणत्या अवस्थेत कार चालवत होता, हे समजू शकते. हे प्रकरण आरटीओच्या अख्त्यारित येत असल्याने त्याची सविस्तर चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी संध्याकाळी प्रतिक बब्बरच्या विरोधातील गुन्हा रद्द झाल्याचे समजले. म्हणजे काही तरी सेटलमेंट झाली असणार हे उघड आहे. प्रतिक बब्बर हा अनुभव सिन्हाच्या “मुल्क’मध्ये होता. त्या सिनेमात प्रतिकने एका दहशतवाद्याचा रोल केला होता. सान्या सागर या लेखिका आणि डायरेक्‍टरबरोबर त्याचा विवाह निश्‍चित झाला आहे. सान्याने लंडनमध्ये फिल्म एडिटिंगचा कोर्स केला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)