प्रतापसिंह शेतीफार्म गेटचे काम अपूर्ण

तळीरामांचा रात्री होतोय वावर : झेडपीने पाऊले उचलण्याची आवश्‍यकता

सातारा –
येथील राधिका रोड परिसरात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या प्रतापसिंह शेती फार्मला तब्बल 60 लाख रुपये खर्च करून नव्याने संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. मात्र, गेटचे काम अपूर्णच ठेवण्यात आले असून त्यामुळे जिल्हापरिषदेचा शेती फार्म संरक्षित करण्याचा मुख्य हेतू बाजूला राहिला आहे. परिणामी शेती फार्ममध्ये रात्रीच्या वेळी तळीरामांचा वावर सुरूच असून येत्या दिवसांमध्ये गेटचे काम पुर्ण न केल्यास अनुचित घटनांमध्ये वाढ होणार आहे.

शेतीफार्मला पुर्वी असलेली संरक्षक भिंत जिर्ण झाल्यामुळे जिल्हापरिषदेने सहा महिन्यांपुर्वी नव्याने संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला मंजूरी दिली होती. कामासाठी तब्बल 59 लाख रूपयांची तरतूद देखील करण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत संरक्षक भिंतीचे काम पुर्ण करण्यात आले. मात्र, शेतीफार्ममध्ये जाण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी ना भिंत बांधण्यात आली आहे, आणि ना नव्याने प्रवेशद्वार बसविण्यात आले आहे.

-Ads-

उलट संरक्षक भिंत व प्रवेशद्वाराच्या दोंन्ही बाजूला प्रत्येकी चार फुटांचे मोकळे अंतर ठेवण्यात आले आहे. परिणामी दिवसा शेतीफार्ममध्ये खेळण्यासाठी जाणाऱ्या मुलांचा वावर सुरू आहे. मात्र, सायंकाळी अंधार पडल्यानंतर त्या ठिकाणी तळीरामांची जणू जत्राच भरताना दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हापरिषदेने तात्काळ नव्याने प्रवेशद्वार बसवावे अथवा अखंड संरक्षक भिंत बांधावी. जेणे करून अनुचित प्रकार टाळता येवू शकणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)