प्रतापगडावर कडेलोट पॉईंटवरुन महिलेची आत्महत्या

महाबळेश्वर, दि. 4 (प्रतिनिधी) – किल्ले प्रतागड येथील कडेलोट पॉईंटवरुन चारशे फूट खोल दरीत उडी मारुन एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. ज्योती नवनीत बल्लाळ (वय 31) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असल्याचे समजते. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
महाबळेश्वरपासून जवळ असलेले ऐतिहासिक किल्ले प्रतापगडवर कडेलोट पॉईंटला असंख्य पर्यटक भेटी देतात. याच कडेलोट पॉईंटवर गुरुवारी सकाळी एका महिलेची पर्स व चप्पल आढळून आल्याने स्थानिकांना शंका आली. त्यांनी खोल दरीत पाहणी केले असता सुमारे तीनशे ते चारशे फुटांवर महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबत स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळावर आढळलेल्या पर्समध्ये मतदान ओळखपत्र, आधारकार्ड सापडले असून प्रथमदर्शनी आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव ज्योती नवनीत बल्लाळ (वय 31, रा काळाचौकी, मुंबई) असल्याचे समजते. या महिलेने तटबंदीवर चढून उडी मारून आत्महत्या केली असल्याची शक्‍यता आहे. कडेलोट पॉईंट हा खोल दरी असलेला किल्ल्याचा भाग असून सुमारे तीनशे ते चारशे फुटांवर असलेल्या या महिलेचा खोल दरीतून मृतदेह वर काढण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान जयवंत बिरामणे, अनिल लांगी, सुनील भाटिया, अनिल केळगने, सुनील वाडकर आदींनी सुमारे चार ते पाच
तासांच्या अथक प्रयत्नाने सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना बाहेर काढण्यात यश आले. याबाबतचा तपास पोलादपूर पोलीस करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)