प्रतापगडाच्या युद्धाने भारतीय राजकारणाला कलाटणी!

डॉ. शिवाजीराव चव्हाण : सिद्धिविनायक व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले

चिंचवड – प्रतापगडाच्या युद्धाने भारतीय राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते डॉ. शिवाजीराव चव्हाण यांनी चिंचवड येथे केले.

स्वा. सावरकर प्रतिष्ठान व स्वा. सावरकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिद्धिविनायक वार्षिक व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. चव्हाण यांनी प्रतापगडचे युद्ध या विषयाने गुंफले. संभाजीनगर येथे आयोजित या व्याख्यानमालेचे उद्‌घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. माजी नगरसेवक मधुकर बाबर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, नगरसेवक केशव घोळवे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रकाश बाबर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ मस्के, अनिल गोडसे, संपत बोत्रे, संजय ढमढेरे, राजू हरेल, सागर मुळीक, राहुल गावडे, विनोद रामाने, विजय आढाव, राहुल वाडकर, महेश पवार, इम्रान बारगीर, दत्ता पटवेकर, शांताराम पवार, संजय कुरबेट्टी, दौलत पवार आदी उपस्थित होते.

डॉ. शिवाजीराव चव्हाण म्हणाले की, शिवचरित्राचा अभ्यास ही काळाची गरज आहे. अठरापगड जातींना एकत्र घेऊन उभे केलेले स्वराज्य, त्यातील सर्वांना समान संधी देत त्यांनी लोकशाही व्यवस्थेचा आदर्श निर्माण केला. जात आणि धर्म न पाहता कर्तुत्वाला वाव दिला. म्हणून शिवरायांचा इतिहास हा चिरंतन मार्गदर्शन करणारा आहे. प्रतापगडाचे युद्ध हे अतिशय धाडसाने व क्‍लुप्तीने लढले गेले. महाराजांनी मोठ्या चातुर्याने अफजलखानाचा पाडाव केला. प्रतापगडच्या युद्धाने भारतीय राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली. त्याचबरोबर हिंदवी स्वराज्यालाही गती मिळाली. अतिशय महत्त्व असणाऱ्या या युद्धासाठी महाराजांना राजमाता जिजाऊंनी प्रेरणा, धैर्य, आत्मविश्वास दिला. राजांची कीर्ती सर्वदूर पसरली.

प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र घावटे यांनी केले. सूत्रसंचालन अरविंद वाडकर यांनी केले. संपत बोत्रे यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)