प्रतापगडमधील महिला गृहातून 26 महिला बेपत्ता

प्रतापगड, (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील महिला आश्रमामधून किमान 26 महिला बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. जिल्हा प्रशासनाने अचानक या महिला आश्रमाची तपासणी केल्यावर ही बाब उघड झाली.

प्रतापगड जिल्ह्यातील अष्टभुजा नगरमधील जागृती निवारा गृह हे भाजपच्या महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा रमा मिश्रा यांच्यावतीने चालवला जाते. या निवारा आश्रमामध्ये 15 महिलांची नोंदणी केली गेली आहे. मात्र प्रत्यक्ष्यात एकच महिला आश्रमामध्ये उपस्थित होती, असे जिल्हा दंडाधिकारी शंभू कुमार यांच्या निदर्शनास आले. आश्रमातील इतर महिला कामानिमित्त बाहेर गेल्याचे व्यवस्थापकाने सांगितले.

-Ads-

याच जिल्ह्यातील अचलपूर येथील अन्य महिला आश्रमामधून 12 महिला बेपत्ता असल्याचे उपविभागीय दंडाधिकारी सत्य प्रकाश सिंह यांना निष्पन्न झाले. तेथे 15 महिलांची नोंदणी झाली होती. या आश्रमाला बाह्यनिधी उपलब्ध होत नसल्याने आपल्या स्वतःच्या उत्पन्नाच्या स्रोतातून आश्रम चालवला जात असल्याचे केअर टेकर महिलेने सांगितले. एकूण 26 महिला बेपत्ता असल्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले असून या सर्व प्रकरणांची चौकशी केली जात आहे.

उत्तर प्रदेशातील देओरिया आणि बिहारमधील मुझफ्फरनगर येथील महिला आश्रमांमधील गैरप्रकार उघड झाल्यानंतर या महिला आश्रमांची अचानक तपासणी करण्यात आली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)