प्रणितींच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुशीलकुमार शिंदेकडून पांघरुण

पुणे – “सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांच्या विषयी आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेले वक्तव्य हे चुकून झालेले आहे. लोकप्रतिनिधींविषयी प्रणितीला नेहमीच आदर असतो,’ असे म्हणत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या चुकीच्या वक्तव्यावर पांघरुणच घातले आहे.

सुशीलकुमार शिंदे पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना सोलापूर येथील खासदार-आमदार यांच्यातील वादाविषयी विचारले असता ते बोलले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांच्या विषयी आमदार प्रणिती शिंदे यांनी “बेवडा’ असा शब्दप्रयोग केला होता. यावरुन बनसोडे व प्रणिती शिंदे यांच्यातील वाद उफाळले आहेत. याबाबत सुशीलकुमार शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, “प्रणितीला लोकप्रतिनिधी विषयी आदर असतो. ती त्यांना मान-सन्मानही देत असते. कधी कोणाविषयी आक्षेप घेत नाही. मात्र सोलापूच्या खासदाराविषयी तिच्याकडून चुकीने वक्तव्य झाले असल्याचे तिने मला फोन करुन सांगितले आहे. त्यामुळे आता हा वाद वाढणार नाही.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)