प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख, हजारीकाना भारतरत्न जाहीर यांचाही सन्मान

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने माजी राष्टपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.याशिवाय भारतीय जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारीका यांचाही भारतरत्न पुरस्काराने मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात येतात.शुक्रवारी सायंकाळी सरकारने हे पुरस्कार जाहीर केले.या यादीत माजी राष्टपती आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांचे नाव असल्याने मोदी सरकारने पुन्हा एकदा राजकीय धक्का दिला आहे.देशाच्या राजकारणातील मुखर्जी यांचे योगदान मोठे असल्याने त्यांचा सन्मान करण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे.नानाजी देशमुख हे भारतीय जनसंघाचे ज्येष्ठ नेते होते.तर भूपेन हजारीका हे इशान्य भारतातील संगीत क्षेत्रातील मोठे नाव होते.या दोघांनाही मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)