#प्रजासत्ताक दिन :राष्ट्रपती ‘रामनाथ कोविंद’ यांच्या हस्ते ‘ध्वजारोहन’

प्रजासत्ताक दिन आपण भारतात मोट्या उत्साहात साजरा करतो. आज प्रजासत्ताक दिनी ९० मिनिटे परेड सुरु असून राजपथावर तिन्ही दलाने शक्तिप्रदर्शन करत तिरंग्याला मानवंदना दिली गेली. देशातील अनेक राज्यांच्या संस्कृतीचं दर्शनही राजपथावर घडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री, लष्कराचे तिन्ही दलप्रमुख यांच्या उपस्थितीत झेंडावंदन पार पडले. राष्ट्रपती’रामनाथ कोविंद’यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाचे राष्ट्रपती ‘रामनाथ कोविंद’ यांनी स्वात्रंत,एकता,आणि बंधुभाव या गोष्टींचा विचार करावा असे, त्यांनी सांगितले. रामनाथ कोविंद यांनी म्हंटले कि,हा प्रजासत्ताक दिन आपल्या सर्वांसाठी अतिशय खास आहे. या वर्षी २ ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची १५० वि जयंती साजरी करणार आहे.तसेच कला,शिक्षण,खेळ आणि बुद्धिमत्ता या व्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये मध्ये देशातील मुली आपली स्वतंत्र ओळखनिर्माण करू शकतात.तसेच सर्व शैक्षणिक विभागांमध्ये नेहमीच मुलांन पेक्षा मुलींनी जास्ती प्रमाणत पुरस्कार प्राप्त केले आहे. त्यांनी असे देखील सांगितले कि, हे वर्ष देशातील नागरिकांना साठी महत्वाची जबादारी पूर्ण करण्याची संधी प्राप्त होणार आहे. येत्या निवडणुकीमध्ये २१ व्या  दशकात जन्मलेले तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)