प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राकडून सादर करण्यात आलेल्या चित्ररथाला सहाव्यांदा प्रथम पुरस्कार

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये आयोजित सोहळ्यात यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाचे सादरीकरण करण्यात आले होते. या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात महाराष्ट्राकडून  सादर  करण्यात आलेल्या देखाव्यांना यापूर्वी देखील ५ वेळेस प्रथम क्रमांक मिळाला आहे. यावर्षी सहाव्यांदा ही किमया साधण्यास  महाराष्ट्राला यश आले आहे.

कलादिग्दर्शक नितीन देसार्इ यांनी हा चित्ररथ बनवला होता. गेल्या वर्षी लोकमान्य टिळक यांच्यावरील चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला होता. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा असणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक प्राप्त करून आपला दबदबा कायम राखला आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक मंत्री अध्यक्ष असलेल्या दक्षिण मध्य कल्चरल झोन कडून सादर करण्यात आलेल्या नृत्यास देखील प्रथम क्रमांक मिळाला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)