प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांसाठी 17 लाखांचा खर्च

पिंपरी – प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 26 जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांचा देशभक्‍तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडीयमवर होणाऱ्या या कार्यक्रमाला सतरा लाख रुपये खर्च होणार आहे.

महापालिका क्रीडा विभाग, शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा हा देशभक्‍तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. प्रथमच होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये महापालिकेच्या प्राथमिकच्या 105 आणि माध्यमिकच्या 18 शाळांमधून प्रत्येकी पन्नास विद्यार्थी याप्रमाणे 6 हजार 150 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या या विद्याथ्रयांना त्यांच्या शाळेतून पीएमपीएमएल बसद्वारे आणणे आणि पुन्हा नेवून सोडणे ही व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन शाळांमध्ये एका बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. साठी 123 बसना प्रत्येकी आठ हजार रुपये प्रमाणे 9 लाख 84 हजार रुपये इतका खर्च येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दहा हजार रुपये आकस्मिक खर्च धरून एकूण 17 लाख 5 हजार रुपये इतका खर्च या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमासाठी येणार आहे. महापालिका क्रीडा विभागाच्या खेळाडू दत्तक योजना या लेखाशिर्षावर 1 कोटी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून 18 लाख रुपयांचा खर्च “सांस्कृतिक कार्यक्रम’ यासाठी वर्ग करण्यात येणार असून देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचा खर्च त्यातून करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त या कार्यक्रमासाठी आवश्‍यक स्टेज, टेबल, खुर्च्या, मैदानावर टाकण्यात येणारे मॅट याचा खर्च महापालिका “ब’ प्रभागाच्या स्थापत्य विभागाकडून, तर जनरेटरसह विद्युत, माईक, स्पीकर व्यवस्था, एलईडी स्क्रीन आदींचा खर्च विद्यूत विभागाकडून करण्यात येणार आहे.

विद्यार्थी अल्पोपहारासाठी चार लाख
विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गुड डे बिस्कीट पुडा, एक लहान पाण्याची बाटली, दोन केळी आणि एक लहान एनर्जी ड्रिंक्‍स देण्यात येणार आहे. त्यासाठी 3 लाख 91 हजार 200 रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या अंदाजे पन्नास पाहुणे, पदाधिकारी, अधिकारी यांचा सत्कार कुंड्यांसह रोप किंवा पुस्तके देवून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या सर्वांना चहापान, बिस्लेरी पाण्याची व्यवस्था आणि अल्पोपहारही देण्यात येणार आहे. त्यासाठी वीस हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी फ्लेक्‍स, बॅनर छपाई करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन लाख रुपये इतका खर्च येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)