प्रजासत्ताकदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

मुंबई: येत्या 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर करु नये, असे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे.

राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दरवर्षी 26जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे, इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात,रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले असतात. हे राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी हे राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी व जनजागृती करण्यासाठीजिल्हा व तालुका पातळीवर समित्या कार्यरत आहेत. शासनाने प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र ही मोहीम सुरु केली आहे. प्लास्टिक बंदीचा कायदा लागू केला आहे. प्लास्टिकची वस्तू वापरल्यास दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे  प्लास्टिकचे ध्वज न वारण्याबाबत शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था यांनी प्रबोधन करणे आवश्यक आहे. ध्वजाचा योग्य सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)