प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी संयम बाळगावा : मनमोहन सिंह 

नवी दिल्ली – प्रचारा दरम्यान, विशेष करून गैरभाजपा सरकारे असलेल्या राज्यांच्या दौऱ्यात प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयम बाळगावा. आपल्या आचरणाने नरेंद्र मोदी यांनी एक आदर्श घालून द्यावा, असा सल्ला माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांच्या “फेबल्स ऑफ फ्रॅक्‍चर्ड टाईम्स’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयम बाळगून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखावी असा सल्ला मी त्यांना देईन, असे सांगून मनमोहन सिह यांनी पुढे सांगितले, की मी पंतप्रधान असताना भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही माझे संबंध सलोख्याचे होते. आम्ही कधी भेदभाव केला नाही. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या गोष्टीची पुष्टी करतील. तेव्हा आम्ही राज्याराज्यांमध्ये कधी भेदभाव केला नाही.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)