प्रगती एक्‍स्प्रेसच्या कोचचे नुतनीकरण

पुणे – पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या प्रगती एक्‍स्प्रेस या रेल्वे गाडीच्या सर्व कोचचे नुतनीकरण करण्यात आले असून या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही नवीन कोच असलेली गाडी रविवारपासून (4 नोव्हेंबर) मार्गावर धावणार आहे.

भारतीय रेल्वेच्या घोरपडी येथील कोचिंग डेपोमध्ये प्रगती एक्‍स्प्रेसचे कोच तयार करण्यात आले आहेत. कोचच्या बाहेरील बाजूस आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. बाहेरील बाजूस मारलेला रंग ड्रस्ट प्रुफला देखील लावण्यात आला आहे. कोचच्या आतील बाजूस आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सीटही आरामदायी बसविण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारी चित्रे प्रत्येक कोचमध्ये रेखाटण्यात आली आहेत. सर्व कोचमध्ये एलईडी लाईट आणि वातानुकूलित कोच तसेच वातावरण सुगंधित राहावे यासाठी नवीन उपकरणे बसविण्यात आली आहेत. टॉयलेट अत्याधुनिक स्वरुपाचे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)