प्रख्यात मराठी संगीतकार यशवंत देव यांचे निधन 

मुंबई: अनेक नादमधुर गीते स्वरबद्ध करणारे मराठी संगीतकार यशवंत देव यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले ते 91 वर्षांचे होते. त्यांना 20 दिवसांपुर्वी दादरच्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथेच मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमाराला त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्यावर दादरच्या स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

1 नोव्हेंबर 1926 अशी त्यांची जन्मतारीख आहे. त्यांनी आपल्या प्रदीर्घ सांगितीक वाटचालीत अनेक सुमधुर मराठी गिते रसिकांना देऊन त्यांच्या मनावर मोहीनी घातली होती. त्यांची अनेक मराठी भावगीते आजही रसिकांच्या विशेष पसंतीची आहेत. त्यांनी जवळपास चाळीस चित्रपटांना संगीत दिले होते. शबानी आझमी अभिनीत साज या चित्रपटालाही त्यांचेच संगीत होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात आकाशवाणीवर सतारवादक म्हणून केली होती. त्यानंतर भावगितांना चाली लावत त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शनाच्या कार्याला सुरूवात केली. त्यांना गदिमा पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कारासह अन्यही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1974 साली त्यांना आम्रपाली नाटकाच्या संगीताबद्दल राज्य सरकारचाही पुरस्कार मिळाला होता. संगीत या विषयावर त्यांनी अनेक पुस्तकेही लिहीली आहेत.तसेच त्यांनी अनेक गीते व रूबयाही लिहील्या आहेत. भावगितांबरोबरच त्यांनी नाट्य गिते, अभंग, गझल, समुहगीत, लोकगीत असे अनेक संगीत प्रकार यशस्वीपणे हाताळत दर्जेदार चालीची गाणी रसिकांना दिली होती. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, जीवनात ही घडी अशीच राहु दे, कुठे शोधीसी रामेश्‍वर, भातुकलीच्या खेळामधील राजा आणिक राणी, ही त्यांची गाणी अजरामर झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)