प्रक्रिया उद्योग उभारणे गरजेचे…

पुणे – यंदा गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. तसेच, उसाच्या उत्पादनात मोठ्याप्रमाणात वाढ झाल्यामुळे पुढील हंगामातही साखरेच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्‍यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून यावर्षी एक ऑक्‍टोबरपासूनच गाळप हंगाम सुरू करण्याचा विचार आहे. हंगाम लवकर सुरू करून कच्ची साखर निर्यात करता येईल आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करून चांगला भाव देता येईल का याबाबतही राज्य शासन विचार करत असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

टोमॅटो हे नाशवंत असून, त्याला हमीभाव देता येत नाही. मात्र, प्रक्रिया उद्योग उभारणे गरजेचे आहे. यासाठी बचत गट, विविध संस्था आणि कापोर्रेट कंपन्यांशी करार करण्यात येणार आहे. यामुळे संस्था सक्षम होतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच आंबा, संत्रा, तांदूळ यांसह विविध प्रकारच्या महोत्सवांसाठी कायमस्वरूपी जागा
मिळविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही सुभाष देशमुख यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)