प्रकाश आंबेडकरांनी मला ओळखण्याची गरज नाही- रामदास आठवले

पुणे : ‘प्रकाश आंबेडकर यांनी कोण रामदास आठवले म्हटले तरी मी कोण प्रकाश आंबेडकर’, असे विचारणार नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर, ज्यांना मी ऐक्यासाठी बोलावूनही ते आले नाहीत ते प्रकाश आंबेडकर, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.

कोपरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी कोण रामदास आठवले, अशा सवाल उपस्थित केला  होता. त्यांच्या या प्रश्नाला आठवले यांनी खास शैलीत उत्तर दिले. मला सारा महाराष्ट्र आणि देश ओळखतो, त्यांनी मला ओळखण्याची गरज नाही असे त्यांनी आंबेडकर यांना ठणकावून सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)