प्रकाश आंबेडकरांनी दिला सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम

मुंबई : संभाजी भिडेंना 8 दिवसांत अटक न केल्यास विधानभवनाला घेराव घालू अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी सरकारला अल्टिमेटम दिले आहे. संभाजी भिडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठिशी घालत आहेत असा घणाघाती आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. संभांजी भिडे यांच्या अटकेसाठी प्रकाश आंबेडकरांनी सरकारला 8 दिवसांचे अल्टीमेटम दिले आहे.

सरकारने भिडेंना 8 दिवसात अटक न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. संभाजी भिडेंवर कारवाई झाली नाही तर कुठल्या शेपटीवर पाय द्यायचा, कोणतं प्रकरण कधी काढायचं हे आपल्याचा चांगलं ठावूक असल्याचा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)