प्रकाश आंबेडकरांना कॉंग्रेसचा पाठिंबा ?

नागपूर: भारिप बहुजन महासंघाते नेते प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी झाली नाही तरीही राज्यातील आंबेडकरवादी मतं आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेस अकोल्यामध्ये त्यांना पाठिंबा देण्याची शक्‍यता आहे. आंबेडकरांना पाठिंबा देऊन त्याबदल्यात राज्यातील मतांचा पाठिंबा मिळू शकतो, अशी कॉंग्रेसला आशा आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधातील महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांना सामील करुन घेण्याची कॉंग्रेसची इच्छा आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी आधीच एमआयएमशी युती केली आहे. एमआयएमची साथ सोडून कॉंग्रेससोबत जाण्यास प्रकाश आंबेडकर तयार नाहीत आणि एमआयएमला सोबत घेण्यास कॉंग्रेस तयार नाही. अशा स्थितीमध्ये प्रकाश आंबेडकरांना अकोला मतदारसंघात पाठिंबा द्यायचा आणि त्याबदल्यात राज्यातील आंबेडकरवादी मतं आकर्षित करायची, अशी कॉंग्रेसची रणनिती आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)