प्रकाशनाआधीच दहावीची नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके व्हॉट्सअपवर व्हायरल

मुंबई:  येत्या वर्षात प्रकाशित होणारी दहावीची नव्या अभ्यासक्रमाची पुस्तक प्रकाशनाआधीच फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नव्या अभ्यासक्रमाचे विज्ञान भाग १ आणि भाग २ ची पुस्तके सोमवारी व्हॉट्सअपवर व्हायरल झाली.
येत्या शैक्षणिक वर्षात दहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करण्याची जबाबदारी बालभारतीकडे आहे. मात्र गाईड बनवणाऱ्या कंपन्यांना फायदा व्हावा, कोचिंग क्लासेसला आधीच अभ्यासक्रम मिळावा या उद्देशाने ही पुस्तके फोडली गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान या घटनेनंतर आता बालभारतीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहे. यापूर्वी नववी ते बारावीच्या पुस्तकांची निर्मिती राज्य शिक्षण मंडळाकडे होती. यंदा दहावीच्या पुस्तकनिर्मितीचं काम बालभारतीकडे आहे. या पुस्तकाची छपाई अजून बाकी आहे. ही छपाई शिल्लक असतानाच पुस्तक व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)