प्रकाशझोतातील कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंड-इंग्लंड सज्ज 

उभय संघांच्या कर्णधारांकडून मानसिक लढाईला प्रारंभ 
ऑकलंड – क्रिकेट या खेळात कसोटी क्रिकेटला सर्वोच्च स्थान आहे आणि कसोटी क्रिकेटला प्रदीर्घ इतिहासही आहे. कसोटी क्रिकेट मध्ये एक मोठा बदल होत असुन न्यीझीलंड क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच प्रकाशझोतात कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
क्रिकेटची सुरुवातच कसोटी क्रिकेटने झाली. त्यानंतर त्यात बदल होऊन एकदिवसीय सामने खेळवले जाऊ लागले. काळानुरूप त्यात टी-20 क्रिकेटची भर पडली. पहिल्यांदा एकदिवसीय सामनेदेखील पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळवले जात. त्या नंतर त्यात बदल झाले आणि रंगीबेरंगी पोशाखांत सामने खेळावयास सुरुवात झाली. त्यातच दिवस-रात्र सामन्यांना प्रेक्षकांची पसंती मिळू लागली.
सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या टी-20 क्रिकेटसमोर आपली लोकप्रियता टिकविण्यासाठीे दिवस-रात्र कसोटीचा पर्याय पुढे आला. कसोटीच्या दिवस-रात्र प्रकारास अनेक देशांच्या क्रिकेट संघटनांनी विरोध केला होता परंतू हळू-हळू या संघटनांचा विरोध मावळत असून प्रकाशझोतात कसोटी सामने खेळावयास सुरुवात झाली आहे. न्यूझीलंड येथे पहिल्यांदाच होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंड व इंग्लंड हे प्रतिस्पर्धी संघ सज्ज झाले असून दोन्ही संघांकडून जोरदार सराव सुरू आहे.
सामन्यापूर्वी दोन्ही संघांकडून प्रतिक्रिया दिल्या जात असून मानसिक लढाईद्वारे एकमेकांवर दबाव टाकण्यास सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने माध्यमांशी बोलताना सांगितले की, या दिवस-रात्र कसोटीचा निकाल पहिल्या तासातच स्पष्ट होऊन जाईल आणि त्यात आमचे वेगवान गोलंदाज निश्‍चितपणे महत्त्वाची भूमिका बजावतील.
इंग्लंडसमोर खेळाडूंची निवड हे मोठेच आव्हान असून न्यूझीलंडला देखील याच समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कारण प्रदीर्घ दौऱ्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंवर खूप ताण पडला आहे. तर अनुभवी फलंदाज रॉस टेलर जायबंदी झाल्याने त्याच्या जागेवर कोणाला खेळवायचे हा प्रश्‍न न्यूझीलंडसमोर आहे. अर्थात दिवस-रात्र कसोटी सामन्यांचा इतिहास पाहिला असता गुलाबी चेंडू यजमान संघासाठी अनुकूल ठरतो असे दिसून आले आहे. आजपर्यंत झालेल्या आठ दिवस-रात्र कसोटी सामन्यांपैकी 7 सामने यजमान संघांनी जिंकले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडच्या मैदानावर गुलाबी चेंडू काय करामत करतो यावर सामन्याचा निकाल स्पष्ट होईल.
दरम्यान इंग्लंडने याआधीची कसोटी मालिका 0-4 अशी गमावली असल्याने त्यांच्यावर या लढतीचे जास्त दडपण आहे. त्यातच ईडन पार्कचे हे मैदान छोट्या मैदानांपैकी एक असल्याने त्याचा फायदा फलंदाजांना होणार आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅग्नरने सांगितले की, आमच्या गोलंदाजांना मैदानाच्याcrick आकाराची कोणतीही चिंता नसून आम्ही यापूर्वी या मैदानावर चांगली कामगिरी केली आहे. तसेच आम्ही या मैदानावर इंग्लंडला पराभूत केले असल्यामुळे आमचा आत्मविश्‍वास उंचावला आहे.
प्रतिस्पर्धी संघ- 
इंग्लंड- जो रूट (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ऍलिस्टर कूक, मेसन क्रेन, बेन फोक्‍स, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मेलन, क्रेग ओव्हरटन, बेन स्टोक्‍स, मार्क स्टोनमन, जेम्स व्हिन्से, ख्रिस वोक्‍स व मार्क वूड.
न्यूझीलंड- केन विल्यमसन (कर्णधार), टॉड ऍस्टल, ट्रेन्ट बोल्ट, कॉलिन डी ग्रॅंडहोम, मॅट हेन्‍री, टॉम लेथॅम, हेन्‍री निकोल्स, जीत रावळ, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅग्नर व बीजे वॉटलिंग.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)