प्रकल्प मंजुरीसाठी एक खिडकी योजना; पर्यावरण, वनविषयक मंजूरी ऑनलाईन मिळणार

नवी दिल्ली: जागतिक जैवइंधन दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने परिवेष या पर्यावरणीय एकल खिडकी केंद्राचा प्रारंभ केला. परिवेष ही एकल खिडकी एकात्मिक पर्यावरण व्यवस्थापन यंत्रणा असून ती संबंधित वेबसाईटवर उपलब्ध आहे.

केंद्र, राज्य आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या विविध मंजुरीसाठी प्रकल्पांकडून ऑनलाईन प्रस्तावांचे सादरीकरण, देखरेख आणि व्यवस्थापनासाठी ती आहे. सर्व प्रकारच्या मंजुरीसाठी (पर्यावरण, वने, वन्यजीवन आणि सीआरझेड) एकल नोंदणी आणि सिंगल साइन इन हे परिवेष चे वैशिष्ट्‌य असल्याचे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री हर्षवर्धन यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे. परिवेष मुळे ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून आर्थिक विकासासाठी आराखडा उपलब्ध व्हायला आणि शाश्वत विकासाला बळकटी मिळायला चालना मिळेल, असे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. 21 व्या शतकात जैवइंधने भारताला नवी गती देऊ शकतात. पिकापासून तयार केलेले हे इंधन असून गावातील तसेच शहरातील नागरिकांचेही जीवन ते बदलू शकतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2004 मध्ये जैवइंधनापासून इथेनॉल उत्पादनाची योजना आखण्यात आली होती. 2014 नंतर इथेनॉल मिश्रण उपक्रमासाठी आराखडा तयार करण्यात आला. याचा शेतकऱ्यांना फायदा झालाच. याशिवाय गेल्या वर्षी 4000 कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत करण्यातही मदत झाली. पुढल्या वर्षी हे लक्ष्य 12 हजार कोटी रुपये ठेवण्यात आले आहे.
बायोमासचे रूपांतर जैवइंधनात करण्यासाठीच्या प्रयत्नात केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करत आहे. 12 आधुनिक शुद्धीकरण कारखाने उभारण्याची सरकारची योजना आहे. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.
जनधन, वनधन आणि गोबरधनसारख्या योजना गरीब, आदिवासी आणि शेतकऱ्यांचे जीवन बदलण्यात साहाय्यकारी ठरत आहेत.

जैवइंधनापासून परिवर्तन घडवण्याची क्षमता केवळ विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञ, उद्योजक आणि नागरिकांच्या सहभागातूनच प्रत्यक्षात उतरु शकेल असे सरकारला वाटते. विविध क्षेत्रातील उद्योजकांकडून वेळोवेळी काही परवान्यांसाठी गरजेपेक्षा जास्त विलंब होत असल्याची तक्रार केली जाते. हळूहळू सर्वच क्षेत्राचे परवाने शक्‍य तितक्‍या लवकर मिळावे याकरिता प्रयत्न वाढविण्यात येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)