प्रकल्पबाधितांना घरे देता येत नसतील तर पैसे द्या

हायकोर्टाचे सरकारला निर्देश
मुंबई – शहर आणि उपनगरांना पाणी पुरवाठा करणाऱ्या तानसा मुख्य जलवाहीन्यांच्याजवळील झोपड्या हटवून त्याचे पुनर्वसनास असमर्थ ठरलेल्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. संबंधित रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधता येत नसेल अथवा पर्यायी घरे उपलब्ध करून देता येत नसतील, तर त्या रहिवाशांना घर घेण्यासाठी पैसे द्या, असे निर्देश न्यायमूर्ती अभय ओक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने राज्य सरकारला दिले.

उच्च न्यायालयाने शहर आणि उपनगरांना पाणी पुरवाठा करणाऱ्या मुख्य जलवाहीन्यांच्या जवळ उभारलेल्या बेकायदा झोपड्या हटविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील या झोपड्या हटविण्यासाठी न्यायालयाने महापालिकेला 31 डिसेंबरची डेटलाईन दिली आहे. ही डेटलाईन जवळ आल्याने पालिकेने सरसकट सर्वच झोपड्यांना नोटीसा बजावून कारवाईला सुरूवात केली.

-Ads-

यानंतर रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

न्यायालयाने याची गंभर दखल घेऊन गेल्या महिन्यात राज्याच्या मुख्य सचिवांना संबंधित रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील अन्य जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशाला अनुसरून मुख्य सचिवांनी शुक्रवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन व्यतिरिक्त इतरही अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामावरील कारवाईत करण्याचा मुद्दा उपस्थित करून या रहिवाशांसाठी जागा शोधू न शकल्याचे कळवताच न्यायालयाने संताप व्यक्त करून राज्य सरकारला फैलावर घेतले.

तुम्हाला करोडो मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची सुरक्षा महत्वाची आहे की अन्य ठिकाणी बेकायदा झोपड्या उभारणाऱ्यांच्या पुनर्वसनाची, असा सवाल उपस्थित केला. तसेच या कारवाईमुळे विस्थापित झालेल्या रहिवाशांसाठी घरे उपलब्ध करून देता येत नसतील, तर त्यांना पैसे द्या, ते रहिवाशी त्या पैशांच्या साहाय्याने स्वत: घर शोधतील, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला बजावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)