प्रकल्पग्रस्तांना भूखंडासाठी सहा महिने मुदतवाढ

पिंपरी- औद्योगिक वसाहती उभारताना संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात प्रकल्पग्रस्तांना 100 चौरस मीटरच्या भूखंडासाठी अर्ज करण्यास सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. केवळ सन-1994 च्या धोरणांतर्गत पात्र ठरणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने राज्यभरात विविध ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारल्या जातात. त्याकरिता शेतकऱ्यांची जमीन देखील संपादित करावी लागते. ही बाब लक्षात घेता, भूमीहिन होणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय दरानुसार जमिनीची नुकसान भरपाई दिली जाते. एखादा उद्योग अथवा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला त्याच औद्योगिक क्षेत्रात 100 चौरस मीटर पर्यंतचा भूखंड देण्याचा निर्णय एमआयडीसी प्रशासनाने घेतला होता. त्याची अंमलबजावणीदेखील झाली आहे. मात्र, संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने 31 मे 2015 पर्यंतच तसा मागणी अर्ज करणे आवश्‍यक होते. मात्र, अनेक शेतकरी 31 मे 2015 पर्यंत मागणी अर्ज करू शकले नासल्याची बाब एमआयडीसी प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.

तथापि अनेक प्रकल्पग्रस्तांकडूनही अशा स्वरूपाचा भूखंड देण्याबाबत एमआयडीसीकडे विचारणा होत आहे. मात्र, ही बाब नियमात बसत नसल्याने, हा भूखंड देण्याचा निर्णय प्रलंबित होता.
दरम्यानच्या काळात या निर्णयाची अंमलबजावणी करताना अर्ज करण्याची 1 मे 2015 पर्यंतच्या मुदतीची अट शिथिल करण्याची प्रकल्पग्रस्तांची आग्रही मागणी आहे. त्याकरिता लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदने देखील देण्यात आली होती. याची दखल घेत, गेल्यावर्षी पार पडलेल्या एमआयडीसी संचालक मंडळाच्या 374 व्या बैठकीत 5756 क्रमांकाचा ठराव पारित करण्यात आला आहे. त्युासार 31 मे 2015 पर्यंत मागणी अर्ज करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. यामध्ये सुधारणा करत, पुढील सहा महिन्यात हे प्रकल्पग्रस्त शेतकरी भूखंडासाठी मागणी अर्ज करु शकणार असल्याचा बदल करण्यात आला आहे.

अर्जासाठी एप्रिल 2019 पर्यंत मुदत
संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुर झालेल्या प्रस्तावानुसार, केवळ 1994 च्या भूखंड वाटप धोरणांतर्गत पात्र ठरलेल्या प्रकल्प्रस्तांनाच या प्रस्तावाचा लाभ मिळू शकणार आहे. त्याकरिता 4 एप्रिल 2019 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे एमआयडीसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)