प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी होणार मालकी हक्काने

पुणे – धरणांमुळे विस्थापित तसेच पूरग्रस्त नागरिकांना शासन जमिनीचे वाटप करते. या सात-बारा उताऱ्यावर अथवा प्रॉपर्टी कार्डवर जरी लाभार्थीचे नाव असले, तरी “मालकी हक्क म्हणून शासन’ असा उल्लेख त्यावर असतो. या जमिनी भोगवटदार वर्ग-2 च्या समजल्या जातात. त्यामुळे मालमत्ता हस्तांतरण करताना प्रत्येक वेळी शासनमान्यता घ्यावी लागते. तसेच सरकारदरबारी त्यासाठी नजराणा भरावा लागतो. या सर्व पार्श्‍वभूमीवर प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनी कायमस्वरुपी मालकी हक्काने प्रकल्पग्रस्तांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

धरणग्रस्त अथवा पूरग्रस्तांना आता त्यांची घरे मालकी हक्काने लवकरच मिळणार आहे. या निर्णयाचा राज्यातील हजारो नागरिकांना फायदा होणार आहे. शासनाकडून विविध घटकांना जमिनी प्रदान करण्यात येतात. या जमिनीचा धारणाधिकार हा वर्ग-2 म्हणून ओळखला जातो. या जमिनींचे रुपांतरण वर्ग-1मध्ये करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. यासाठी शासनाने एक समिती नेमली होती. समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला आहे. आता शासनाने त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये आवश्‍यक तो बदल केला आहे. वर्ग-2 च्या जमिनी वर्ग-1 मध्ये करण्यासाठी कार्यपद्धती ठरविली आहे.

-Ads-

भाडेपट्ट्याने अथवा कब्जेहक्‍काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनींपैकी कृषी, रहिवासी व वाणिज्यिक उपयोगासाठी प्रदान करण्यात आलेल्या जमिनी वर्ग-1 मध्ये रुपांतरित होणार आहेत. यासाठी शासनाकडे नजराणा अथवा अधिमूल्य किती भरायचे, याचेही दर ठरविले आहे. वर्ग 2 च्या जमिनींचे हस्तांतरणापोटी राज्य शासनाकडे दरवर्षी साधारणपणे हजार कोटींचा महसूल जमा होतो. त्यामुळे या निर्णयाला मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला. यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होईल, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. जर वर्ग-2 जमिनींचे रुपांतरण वर्ग-1 मध्ये करण्यासाठी एकाच वेळी शासनाकडे मोठा महसूल जमा होईल. तसेच हा महसूल हजार कोटींच्या तुलेनत कित्येक पटीने अधिक असेल, अशा विश्‍वास महसूलमंत्र्यांनी व्यक्त केल्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी या निर्णयास पाठिंबा दिला.

अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासनाने कब्जेहक्काने अथवा भाडेपट्याने जमिनी दिल्या आहेत, त्यादेखील आता या सोसायटींच्या सभासदांच्या नावाने होणार आहे. या निर्णयाचा फायदा हजारो नागरिकांना होणार असून हजारो एकर जमीन प्रकल्पग्रस्तांच्या नावाने होणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)