प्रँक व्हिडिओ करणाऱ्या तीन तरुणांना अटक

मुंबई : लोकल चालवणाऱ्या मोटरमनला प्रश्न विचारुन त्रास देत त्यांचे व्हिडिओ शूट करणाऱ्या तरुणांच्या मुसक्या  मध्य रेल्वेच्या आरपीएफने आवळल्या आहेत. मोटरमनला नाहक प्रश्न विचारुन आरोपी त्यांना त्रास द्यायचे आणि या प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर पोस्ट करायचे. गेल्या वर्षी अनेक मोटरमननी याबाबत तक्रार दिल्यानंतर तिघांचा शोध घेण्यात आरपीएफला यश आले.

यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन पैसे मिळवण्याचं फॅड सध्या सुरु झालं आहे. हीच आवड विक्रोळीतील तिघा तरुणांना महागात पडली आहे. केवळ थट्टा म्हणून मोटरमन आणि सामान्य नागरिक यांच्यासोबत हे तरुण प्रँक करायचे. ते मोबाइलमध्ये रेकॉर्ड करुन यूट्यूबवर अपलोड करायचे. एक-दोन व्हिडिओजना चांगले व्ह्यूज मिळाल्यानंतर त्यांनी सपाटाच लावला. याबाबत पाच मोटरमननी गेल्या वर्षी तक्रार नोंदवली होती. त्याचा तपास आरपीएफ करत होती. अखेर सायबर सेलची मदत घेऊन विक्रोळी भागातून तिघांना अटक करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)