पौड पोलीस ठाण्यात मिठाई वाटप

पिरंगुट, दि. 10 (वार्ताहर)- पौड पोलीस स्टेशन येथे भाजपा युवा मोर्चातर्फे मिठाई वाटप करण्यात आली. आपण सर्वजण आनंदात सण साजरे करतो. कारण पोलीस चोवीस तास काम करत असतात. आपण जेव्हा आपल्या कुटुंबांसोबत आनंदात दिवाळी साजरी करत असतो. तेव्हा पोलीस आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या रक्षणासाठी दक्ष असतात. काम करत असतात. त्यामुळे भाजपा युवा मोर्चातर्फे पौड पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी पौडचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक मोहन मोहिते, भाजपा युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष सागर मारणे, पोलीस कर्मचारी, प्रमोद शेलार, केतन देशमुख, रोहित शेडगे, सोबीत बॅंनर्जी इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)