पौड पोलिसांचे शांतता राखण्याचे आवाहन

पिरंगुट- मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. मुळशी तालुक्‍यात शांततेचे वातावरण आहे. त्यामुळे ही शांतता कायम ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे आवाहन पौडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे यांनी केले.
सकाळ मराठा समाजाच्या वतीने 9 जुर्ले रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पौड पोलिसांच्या वतीने मुळशीतील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याशिवाय पिरंगुट, भुगाव, भुकुम, लवळे, उरावडे, कासार आंबोली आदी गावात बैठक घेऊन नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
पिरंगुट येथे झालेल्या बैठकीत सहायक पोलिस निरीक्षक उद्धव खाडे म्हणाले की, सध्या राज्यभर मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहेत. मुळशीत आतापर्यंत सर्व आंदोलने शांततेत झाली आहेत. यापुढेही अशीच शांतता राखून कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे. आंदोलना दरम्यान कोणताहा हिंसक प्रकार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यावेळी मुळशी तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पवळे, माजी सरपंच रमेश पवळे, माजी सरपंच मोहन निकटे, कोतवाल संघटनेचे अध्यक्ष संतोष मंडले, ग्रामपंचायत सदस्य अशोक ओव्हाळ, पोलीस कर्मचारी अब्दुल शेख, संजय राक्षे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)