पौडमध्ये बुधवारी वयोपरत्वे अपंगत्व शिबिर

पिरंगुट- ज्येष्ठ नागरिकांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून पौड (ता. मुळशी) येथे बुधवारी (दि. 28) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिवसभर वयोश्री योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्‍यांतील ज्येष्ठ नागरीकांनी अंगणवाडी स्वयंसेविका अथवा आशा स्वयंसेविकांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील चांदेरे यांनी केले आहे. ज्येष्ठ नागरीकांना वयोपरत्वे येणाऱ्या अपंगत्वाचे तपासणी शिबिर पौड येथील सरकारी रूग्णालयात बुधवारी (दि.28) होईल. यात ज्येष्ठांची तपासणी करून आवश्‍यकतेनुसार आधार काठी (कुबडी), तिपाई काठी, दाताची कवळी, चष्मा, ऐकु येण्याचे यंत्र, स्वयंचलीत कृत्रिम दांडी, चाकाची खुर्ची आदींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठांना आधार कार्डव्यतिरिक्त एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला तहसिलदारांचा दाखला, इंदीरा गांधी पेन्शन योजनेचा दाखला, प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी असल्याची दाखला, संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी असल्याचा दाखला किंवा दारिद्रय रेषेखालील दाखला यापैकी एकाची पूर्तता करणे आवशक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)