पोह्याच्या भावात वाढ

पुणे – भाताच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम पोह्यांवर झाला आहे. पोह्याच्या भावात वाढ होत आहे. एप्रिल सुरू झाल्यापासून पोह्याच्या भावात प्रतिक्विंटल 200 रुपयांनी वाढ झाली आहे. पोह्याच्या भावातील तेजी दिवाळीपर्यंत कायम राहणार आहे. साधारण ऑक्‍टोंबर, नोव्हेंबरच्या आसपास नवीन पिक येते. त्यावेळीच पोह्याचे भाव खाली येतील, असा अंदाज व्यापारी वर्गांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
याविषयी व्यापारी कांतीलाल गुंदेचा म्हणाले, देशात विशेषत: छत्तीसगढ, मध्यप्रदेश, गुजरात येथे पोह्याच्या भाताची लागवड केली जाते; तर राज्यात केवळ रायगड जिल्ह्यात अल्प प्रमाणात हे पीक घेतले जाते. परराज्यांमध्ये आयआर 8, महामाया तर रायगड जिल्ह्यात जया या भाताचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये कांदे पोहे, दगडी पोहे आणि पातळ पोह्यांचा समावेश आहे. परराज्यातून या पोह्यांची मार्केटयार्डातील भुसार बाजारात सर्वाधिक आवक होते. सध्यस्थितीत मार्केटयार्डात दररोज 5 ट्रक माल दाखल होत आहे. त्याच्या प्रतिक्विंटलला 3 हजार 800 ते 4 हजार रुपये भाव मिळत आहे. गेल्या महिन्यात याच पोह्यांचा प्रतिक्विंटलचा भाव 3 हजार 600 ते 3 हजार 800 होता. महिन्याभरात त्यामध्ये 200 रुपयांनी वाढ झाली आहे.
घरगुती ग्राहक तसेच स्टॉल धरकांकडून कांदे पोहे बनविण्यासाठी पोह्यांना मागणी राहाते. तर, फरसाण तसेच चिवडा उत्पादकांकडून दगडी तसेच पातळ पोह्यांची खरेदी करण्यात येते. यंदा भाताचे उन्हाळी पीक कमी झाले आहे. परिणामी, कच्च्या मालाच्या भावात वाढ होऊन पोह्यांच्याही भावात वाढ झाली आहे. ती येत्या दसरा, दिवाळीपर्यंत कायम राहण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)