‘पोहोच’ न घेताच काढली बिले

नगरसेवकांकडून कापडी पिशव्या वाटपांचा फंडा : किती आणि कोठे वाटल्या यात हिशेब नाही

पुणे – प्लॅस्टिक बंदीची चर्चा सुरू झाल्यानंतर लगेचच नगरसेवकांनी कापडी पिशव्या वाटपाचा फंडा सुरू केला. यावर्षी तर घरोघरी या पिशव्या वाटल्याच. परंतु गेल्या वर्षीही नगरसेवकांतर्फे घरोघरी कापडी पिशव्या (जूट बॅग) पोचविण्यात आल्या. या नगरसेवकांनी तेव्हा नेमक्‍या किती आणि कोठे पिशव्या पोहोचवल्या याचा हिशेब न घेताच क्षेत्रीय कार्यालयांनी तब्बल पावणे तीन कोटी रुपयांची बिले मात्र दिली आहेत. एवढेच नव्हे तर काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पिशव्या खरेदीच्या फायली दडवल्याचेही स्पष्ट झाले आहे.

गेल्या दोन वर्षात किती रकमेच्या कापडी पिशव्या खरेदी करण्यात आल्या आहेत, याचा ताळमेळ महापालिकेलाही लागत नाही. दरम्यान, याबाबतचा सविस्तर अहवाल मांडण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

मूळ नियम बाजूला सारून नगगसेवकांनी आपापल्या प्रभागात कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे. त्यातही गरज नसतानाही पिशव्या वाटण्यात आल्या असून, काही प्राभागात तरतुदीपेक्षा पाच पट रकमेच्या पिशव्या खरेदी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडून पिशव्या घेणे अपेक्षित असूनही त्या प्रोफेशनल व्यावसायिकांकडून घेतल्याचेही दिसून आले आहे.

त्याहून कमी की काय पिशव्यांची संख्या कमी करून त्यांच्या बिलाचे आकडेही या मंडळींकडून फुगवले गेले आहेत. त्यातून स्वत:सह व्यावसायिकांचेही भले करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर पिशवी खरेदीची आढावा घेतला असताना त्यातील गैरव्यवहार उघड झाले आहेत.

विविध अकरा क्षेत्रीय कार्यालयांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातून पावणेतीन कोटी रुपयांची खरेदी केल्याचे दाखविले आहे. प्लॅस्टिक वापरावर मर्यादा येण्यासाठी महापालिका ही नागरिकांना मोफत कापडी पिशव्या वाटप करते. त्यासाठी सहयादी किंवा वॉर्डस्तरीय निधीचा वापर केला जातो. नगरसेवकांच्या एका पत्रावर क्षेत्रीय कार्यालयाकडून सर्रास अशा योजना राबवण्याला मंजुरी दिली जाते. पिशव्यांच्या खरेदीचेही असेच झाले असून, बचत गटांकडून पिशव्या मिळाल्याचे नगरसेवकांनी दाखवले आहे. याबाबत आलेल्या तक्रारीची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून, त्यासंबंधीचा अहवाल मागीतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)