पोहायला गेलेल्या तरुणाचा बुुुडून मृृत्यू

वाघोली-उन्हाळ्याचे दिवस असल्याने पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या तरुणाने नदीत उडी मारल्यानंतर तो परत वर आलाच नाही. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.
गणेश पांडुरंग गजरे (वय 23) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील भीमा नदीवर गणेश गजरे हा शनिवारी सायंकाळी पोहण्यासाठी गेला होता. त्याला पोहताही येत होते; परंतु पाण्यात त्याने डोक्‍यावर सूर मारला मात्र तो बराचवेळ झाला तरी वर आला नाही. तेथे असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिकांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर सर्वांनी शोधाशोध केली असता विवाहित गणेशचा मृतदेह पाण्यात आढळून आला. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. गणेश हा मनमिळाऊ असल्यामुळे पिंपरी सांडस या गावात शोककळा पसरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)