पोस्टाद्वारे बॅंकिंग सेवा सुरू…

नवी दिल्ली – पोस्टाच्या कार्यालयांतून बॅंकेची सेवा सुरू करण्याच्या उपक्रमाला पासून प्रारंभ झाला. इंडियन पोस्ट पेमेंट बॅंक असे या सेवेचे नाव असून सुरूवातीच्या टप्प्यात देशातील 650 टपाल कार्यालयांतून ही मर्यादित स्वरूपाची बॅंकिंग सेवा सुरू करण्यात आली आहे. बॅंकांच्या अन्य सेवा यातील खातेदारांना मिळणार असल्या तरी कर्जाचे व्यवहार मात्र येथून होणार नाहीत.

देशात पोस्ट खात्याचे मोठे नेटवर्क उपलब्ध आहे. त्याद्वारे ग्रामीण आणि दुर्गम भागात बॅंकिंग सेवा उपलब्ध करून देणे हा सेवेचा प्रमुख उद्देश आहे. इंडीयन पोस्ट पेमेंट बॅंकेद्वारे आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात बॅंक सेवा याद्वारे उपलब्ध करून देणार आहोत अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमीत्ताने दिली. देशभरात पोस्टाच्या 1 लाख 55 हजार शाखा आहेत. त्या सर्व शाखा बॅंकेशी जोडल्या जाणार आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत हे काम पुर्ण केले जाणार आहे. सध्या 650 पोस्ट कार्यालयांमध्येच ही सेवा उपलब्ध असली तरी या सेवे अंतर्गत 3 हजार ठिकाणी ऍक्‍सेस पॉईन्ट दिले जाणार आहेत त्यामुळे तेथूनही नागरीकांना बॅंकिंग सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.

पोस्ट खात्याला बॅंकिंगची अनुमती मिळाल्यानंतर आता त्याद्वारे सरकारी बॅंकाही अन्य खासगी बॅंकांप्रमाणे आपले नेटवर्क वाढवू शकणार आहेत. सध्या एअरटेल पेमेंट बॅंक, पेटीएम पेमेंट बॅंक अशा खासगी क्षेत्रातील कंपन्या या क्षेत्रात कार्यरत आहेत.

या खात्यातून ज्या बॅंकिंग सेवा उपलब्ध होणार आहेत त्यात बचत खाते सुरू करणे, करंट अकाऊंट उघडणे, पैसे जमा करणे, अन्यत्र पाठवणे, विविध प्रकारची बिले भरणे इत्यादी सेवांचा समावेश आहे. एसएमएस, आयव्हीआर, मोबाईल बॅंकिंग ऍप इत्यादी सेवांद्वारे ही सेवा नागरीकांना तेथून उपलब्ध होईल. या आधी झारखंड आणि छत्तीसगड या दोन राज्यांतील काही पोस्ट ऑफिेसेस मध्ये ही सेवा गेल्या जानेवारी महिन्यापासून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती. त्याची व्याप्ती आता वाढवण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)