पोस्टरबाजीतून मनसेचा पुन्हा शिवेसेनवर बाण 

मुंबई: राम मंदिर उभारणीचा मुद्या उपस्थित करून अयोध्या दौरा करणा-या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेला डिवचले आहे. “अयोध्येला निघालो जोशात, राजीनामे मात्र अजूनही खिशात’ असे लिहिलेले पोस्टर्स मनसेने शिवाजी पार्क परिसरातील सेना भवनाच्या समोरच झळकवली आहेत.

 

शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये रंगणारे पोस्टरयुद्ध नवीन नाही. यापूर्वीही शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी करुन मनसेने अनेकवेळा बाण सोडले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेची खोचक पोस्टरबाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

राज्यात आणि केंद्रात भाजपासोबत सत्तेत असतानाही राम मंदिर उभारण्याच्या मागणीवरुन सरकारविरोधात पवित्रा घेतला आहे. भाजपाला इशारा देताना उद्धव ठाकरेंच्याच आपल्या आमदारांचे राजीनामे खिशात असल्याच्या वक्तव्यावरुन मनसेने त्यांना पुन्हा एकदा छेडले आहे.

निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसा राम मंदिराचा मुद्दा उचलला जात आहे. शिवसेनेनेही राम मंदिराचा मुद्दा उचलून धरल्याचे दिसत आहे. हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तर राम मंदिरावरुन भाजप-शिवसेनेचा पोरखेळ सुरु असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)