पोस्टमन सर्वांच्या घरापर्यंत बॅंकिंग सेवा पोहोचवतील 

नवी दिल्ली: इंडिया पोस्ट पेमेन्ट्‌स बॅंकेचे उद्‌घाटन 21 ऑगस्ट रोजी करण्यात येईल अशी माहिती सरकारकडून देण्यात आली. पेमेन्ट्‌स बॅंकेचे सादरीकरण करण्याबरोबरच आयपीपीबी ऍपही सादर करण्यात येईल. या ऍपच्या मदतीने ग्राहकांना साधारण 100 कंपन्यांच्या सेवेचे देयक देता येईल. .
देशातील प्रत्येक जिल्ह्यात इंडिया पोस्ट पेमेन्ट्‌स बॅंकेची किमान एक शाखा असणार आहे आणि ग्रामीण भागात आर्थिक सेवा देण्यासाठी लक्ष देण्यात येईल. सध्या देशातील 1.55 लाख पोस्टऑफिसमध्ये ग्राहकांना बॅंकिंग आणि आर्थिक सेवा देण्यात येईल. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील सर्व 1.55 लाख पोस्ट ऑफिसमध्ये इंडिया पोस्ट पेमेन्ट्‌स बॅंकेची सेवा जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे देशातील सर्वात मोठे बॅंकिंग जाळे गावापर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
इंडिया पोस्ट पेमेन्ट्‌स बॅंकेच्या पहिल्याच दिवशी 650 शाखा सुरू करण्यात येणार आहेत.
याव्यतिरिक्त पोस्ट ऑफिसमध्ये तिच्या 3,250 एक्‍सेस पॉईन्ट्‌स सुरू होतील. ग्रामीण आणि शहरी भागात साधारण 11 हजार पोस्टमन घरापर्यंत बॅंकिंग सेवा पोहोचवतील असे आयपीपीबीचे सीईओ सुरेश सेठी यांनी गेल्या आठवडयात म्हटले होते. पोस्टाच्या बचत खात्यातील 17 कोटी खाती आयपीपीबीला जोडण्याची परवानगी देण्यात आली. मोबाईल ऍप आणि पोस्ट ऑफिसमध्ये जात पैसे हस्तांतरणाची सेवा समाविष्ट आहे. लोकांना आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस प्रमाणे सेवांचा लाभ घेता येईल. याप्रमाणे अनुदान देण्यासाठी त्याचा वापर सरकारकडून करण्यात येईल.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)