पोषण आहाराचे पावणेदोन कोटी थकले

खेड तालुक्‍यातील स्थिती : 465 शाळांचे अनुदान रखडलेले

राजगुरूनगर – खेड तालुक्‍यातील शालेय पोषण आहाराची सुमारे पावणेदोन कोटींची बिले थकली असून ती तत्काळ काढण्याची मागणी होत आहे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खेड तालुक्‍यातील सुमारे 465 प्राथमिक शाळांचे ऑक्‍टोबर 2017 ते मार्च 2018 पर्यंतच्या सहा महिन्यांच्या कालावधीची शालेय पोषण आहाराची सुमारे पावणेदोन कोटींची बिले थकीत आहेत. ही रक्कम शाळांच्या खात्यावर जमा करण्यासंदर्भात संबंधित शाळा प्रमुखांनी पंचायत समितीकडे वारंवार विनंती केली; परंतु निधी उपलब्ध नसल्याने बिले काढण्यात आलेली नाही. पहिली ते पाचवीपर्यंत डिसेंबर महिन्यांपासून व सहावी ते आठवीपर्यंत ऑक्‍टोबर महिन्यांपासून हे अनुदान रखडले आहे. यात इंधनखर्च ,पोषण आहार देण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचा खर्च भाजीपालाखर्च ,मदतनीस मानधन आदींचा समावेश आहे .पोषण आहाराची बिले मिळाली नसल्याने त्यातील इंधन, भाजीपाला, धान्यादी माल , मदतनीस मानधन याची वारंवार विचारणा बचत गटाच्या महिला, अंगणवाडी मदतनीस शाळेच्या मुख्याध्यापकांडे वारंवार विचारणा करत आहेत. सहा महिन्यांपासून ही बिले थकीत असल्याने त्यांची आर्थिक अडचण झाली आहे. बचत गटाच्या महिला, पोषण आहार शिकवणाऱ्या महिला शाळांमधील मुख्याध्यापक व शाळाप्रमुख यांच्याकडे सततची मागणी करीत असल्याने ते त्रस्त झाले आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी बिले जमा करण्यात यावी, अशी विनंती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी इंदिरा आस्वार यांच्याकडे पदवीधर शिक्षक संघटनचे अध्यक्ष शांताराम नेहेरे, सरचिटणीस नारायण करपे यांनी केली आहे .

पदवीधर शिक्षक संघटनचे अध्यक्ष शांताराम नेहेरे यांनी सांगितले की, तालुक्‍यात अनेक शाळांची शालेय पोषण आहाराची बिले प्रलंबित आहेत. गावातील बचत गट हा आहार शिजवतात त्यासाठी त्यांचा खर्च होतो.सहा महिने झाल्याने त्यांना बिले मिळाली नाहीत. शैक्षणिक सत्र होण्यापूर्वी ही बिले शाळांना मिळावीत यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. त्यांनी दोन दिवसांत बिले काढण्याचे सांगितले आहे.

पोषण आहाराची बिले बॅंकेत जमा करण्यासाठी पाठविण्यात आले होती मात्र, त्यात तांत्रिक अडचण काढून ती परत आली. आठ दिवसांपासून ती प्रलंबित आहेत. या बिलांच्या प्रत्येक पानावर सही असणे आवश्‍यक होते मात्र, त्याबाबत प्रमाणपत्र बॅंकेत सादर केले होते, तरीही बॅंकेने ते नाकारल्याने पोषण आहाराच्या प्रत्येक बिलाच्या पानावर अधिकाऱ्यांची सही गरजेची होती. जवळपास अडीच हजार पानावर साह्य करण्यासाठी वेळ गेला. दोन दिवसांत सर्व बिले काढली जातील.
– इंदिरा अस्वार, गटविकास अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)