पोषण आहाराचे काम काढून घेऊ नका

बचतगटांची मागणी : “अक्षयपात्र’ संस्थेस दिले काम

पुणे – महापालिका शाळांमधील मुलांसाठीचे शालेय पोषण आहाराचे काम काढून घेऊ नये, अशी मागणी बचतगटांनी महापालिका पदाधिकाऱ्याकडे केली आहे.

-Ads-

महापालिका शाळांमधील 25 हजार मुलांना सीएसआर योजनेंतर्गत पोषण आहार दिला जातो. याचे काम “अक्षयपात्र’ या संस्थेस देण्यात येणार आहे. त्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून, हडपसर, वानवडी, कोंढवा- येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये ही योजना राबविली जाणार असून त्यास स्थायी समितीनेही मान्यता दिली आहे. याची अंमलबजावणी पुढील वर्षांपासून करण्यात येणार आहे.

बचतगटांनी दिलेल्या पत्रानुसार, गेल्या दहा वर्षांपासून बचतगट शाळांना आहार पुरवीत आहेत. त्यामुळे आम्हाला या कामाचा अनुभव आहे. महाराष्ट्र शासनाकडून महिला सक्षमीकरणाच्या हेतूने पुणे महानगरपालिकेत नागरीवस्ती विभाग कार्यरत झाला असून त्यांतर्गत महिला बचत गट स्थापन झाले होते. महिला बचत गटांमध्ये गोरगरीब व गरजू महिला एकत्रपणे काम करून सक्षम होण्याचा प्रयत्न करत असतात. याचाच एक भाग म्हणून पालिकेकडून शालेय पोषण आहाराचे काम देण्यात आले होते. मात्र, आता या निर्णयामुळे बचत गटात काम करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)