पुणे – लक्ष्मी पुजा करायची असल्याचे सांगून एका महिलेचे 1 लाख 32 हजाराचे दागिने हात चलाखीने चोरण्यात आले. ही घटना कोथरुड येथील एका पोळी भाजी केंद्रात घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी वंदना कुमार (53, रा. पर्वती गाव) या पतीसमवेत पोळी भाजी केंद्रात काम करत असताना एका अनाळखी व्यक्ती तेथे आला होता. त्याने गरीबांना जेवण दान करायचे असे सांगून 110 रुपये अगाऊ रक्कम दिली. यानंतर 100 रुपयांची नोट काढून फिर्यादीला नोटेवर सोन्याची अंगठी व चार बांगड्या काढुन ठेवण्यात सांगितले. त्याची लक्ष्मी पुजा करायची असल्याचे सांगून विश्‍वास संपादन केला. यानंतर हातचलाखीने 100 रुपयांच्या नोटेसह दागिने गुंडाळून ते पिशवीत ठेवण्याचा बहाणा केला. ही पिशवी फिर्यादीला देवापुढे ठेवण्यास सांगण्यात आली. फिर्यादीने थोड्या वेळाने पिशवी उघडून बघितली असता, त्यात दागिने आढळले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी महिला सहायक पोलीस निरीक्षक पंचभाई तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)