पोल्ट्री व्यवसाय पाण्याअभावी संकटात

मंचर – सध्या तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढतच चाललेला आहे. सद्यःस्थितीत तापमान 44 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. त्यामुळे या तीव्र उन्हाळ्यात बहुतांशी पोल्टी फार्म पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
सध्या सुरू असलेले लग्नसोहळे, वाढदिवस पार्ट्या यांमुळे बॉयलर कोंबडीला जास्तच मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, पाणीटंचाईमुळे अनेक पोल्ट्री व्यवसाय बंद होत आहेत. ग्राहकांची चिकनला असणारी मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ बसत नसल्याने ऐन उन्हाळयात चिकनचे दर किलोला 90 ते 95 रुपयांच्या पुढे गेले आहेत. घाऊक बाजारामध्ये असलेली बॉयलर कोंबडीची कमतरता, तुटवडा यामुळे बॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग रेटमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बॉयलर कोंबडीच्या भावामध्ये प्रचंड वाढ झाली असल्या कारणाने गोरगरिबांच्या आवाक्‍यात असलेले बॉयलर कोंबडीचे चिकन मात्र भाव खाताना दिसत आहे. चिकन शौकिनांच्या खाण्यावर विरजण पडले असल्याचे दिसून येत आहे. चिकन खवय्यांची चिकनच्या दरात अचानक भाववाढ झाल्यामुळे परवड झाली असल्याचे दिसून येते आहे.

  • बॉयलर कोंबडी किलोला170 रुपये
    सध्या घाऊक बाजारात बॉयलर कोंबडीचा किलोचा दर 100 रुपयांच्या पुढे गेला आहे. किरकोळ विक्री करणाऱ्या चिकन व्यावसायिकांना बॉयलर कोंबडीचा माल पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांकडून 102 ते 103 रुपये दरम्यान पोहोच माल मिळत आहे. किरकोळ विक्री करणारे चिकन व्यवसायिक किलोला 160 ते 170 रुपये भावाने बॉयलर कोंबडीचे चिकन विकत असल्याचे दिसून येत आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)