पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे- पोलीस हवालदार उमेश राऊत यांनी स्वारगेट पोलीस लाईनमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने पोलीस लाईनमध्ये एकच खळबळ उडाली.
उमेश राऊत हे डेक्कन पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. ते स्वारगेट येथील पोलीस लाईनमध्ये बिल्डिंग नंबर 6 मध्ये राहात होते. गुरुवारी सकाळी ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पोलीस तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)