पोलीस वाहनांना जीपीएस ‘कंट्रोल’

संजय कडू

“हायटेक’ निर्णय : शहर पोलिसांच्या 500 वाहनांना बसणार यंत्रणा

-Ads-

यंत्रणेशी छेडछाड केल्यास वाजणार अलार्म : कार्यक्षमता तपासणार

पुणे – एखादी दुर्घटना किंवा गुन्हा घडल्यास नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाला आणि तेथून संबंधित पोलीस स्टेशन अथवा बीट मार्शलला याची माहिती दिली. ते तातडीने घटनास्थळी पोहचून नागरिकांची मदत करतात. मात्र, अनेकदा पोलिसांची मदत वेळेवर पोहचत नसल्याचा अनुभव नागरिकांना येत असतो. यामुळे पुणे पोलीस दलातील 500 वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना तातडीने मदत मिळू शकेल. तसेच घटनास्थळजवळपास असलेल्या पोलीस वाहनांना घटनास्थळी पाठवणे सोपे होणार आहे.

जीपीएस यंत्रणेचा नेमका काय होणार उपयोग?
पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेचे कर्मचारी शहरात रात्रंदिवस गस्त घालतात. शिवाय बीट मार्शलही गस्त घालतात. पॅट्रोलिंगसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर केला जातो. पोलीस ठाण्याच्या पातळीवर गस्त घालण्याचे मार्गही ठरवून दिले जातात. मात्र अनेकदा बीट मार्शल मार्गावर “शॉर्टकट’ वापरतात. तर काही वेळा एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबतात. पॅट्रोलिंग करताना वाहन ठराविक वेगाने चालवणे आवश्‍यक असते. तेथेही काही वेळा वाहन वेगाने नेऊन पॅट्रोलिंग लवकर उरकले जाते. घटनास्थळी पोहचण्यासही कुचराई केली जाते. यामुळे अनेकदा तक्रारदाराला न्याय मिळत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन पोलिसांच्या बीट मार्शल, सीआर व्हेईकल आणि पॅट्रोलिंग वाहनांना जीपीएस यंत्रणा लावण्याचा निर्णय पोलीस आयुक्‍तांच्या स्तरावर घेण्यात आला होता. यासंदर्भात मध्यंतरी एक टेंडरही काढले गेले होते. परंतु, काही कारणास्तव ते रद्द करावे लागले. सध्या मात्र पोलीस महासंचालक पातळीवर टेंडर प्रक्रिया राबवली गेली आहे. यामुळे पुणे शहर पोलीस दलातील 500 वाहनांना जीपीएस यंत्रणा बसणार आहे.

चार स्क्रीनद्वारे नियंत्रण
वाहनांना जीपीएस यंत्रणा लावल्यानंतर त्याचे नियंत्रण पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून होणार आहे. येथे चार झोनसाठी चार स्क्रीन लावण्यात येणार आहेत. येथे जीपीएस लावलेल्या वाहनांचे “लोकेशन’ कळणार आहे. कोणते वाहन एका ठिकाणी किती वेळ थांबले, कॉल आल्यावर घटनास्थळी किती वेळात पोहचले, तसेच घटनास्थळापासून कोणते पोलीस वाहन जवळ आहे, ही सर्व माहिती स्क्रीनवर दिसून येणार आहे. पोलीस कर्मचाऱ्याने जीपीएस यंत्रणेशी छेडछाड केल्यास नियंत्रण कक्षात लगेचच “अलार्म’ वाजेल. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करणेही सोपे जाणार आहे.

जीपीएस यंत्रणेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल. तसेच प्रभावीपणे पॅट्रोलिंगसाठी याचा वापर होईल. एखाद्या नागरिकाने तक्रार दिल्यास तातडीने त्याच्या मदतीला धावून जाता येईल. यामुळे जीपीएस यंत्रणा महत्वाची ठरणार आहे.
शेषराव सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त, प्रशासन विभाग.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)