पोलीस वसाहतीतील स्वच्छतागृहाचा प्रश्न मार्गी

आमदार कोल्हे; झगडेफाटा विश्रामगृहाची दुरुस्ती करण्याचे आदेश
कोपरगाव – पोलीस कर्मचारी वसाहतीतील शौचालयाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. आता चार लाख 99 हजार रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली. झगडेफाटा येथील शासकीय विश्रामगृहाचीदेखील पाहणी करून तेथील दुरवस्था तसेच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील अंतर्गत असुविधांच्या दुरुस्तीबाबतही आ. कोल्हे यांनी उपअभियंता प्रशांत वाकचौरे यांना आदेश दिले.
या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, नगरसेवक स्वप्नील निखाडे, डॉ. गोवर्धन हुसळे, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. आ. कोल्हे यांनी पोलीस कर्मचारी वसाहतीतील स्वच्छतागृहांची पाहणी केली. या वेळी वाकचौरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर आदी उपस्थित होते.
कोल्हे म्हणाल्या, की पोलिस वसाहतीतील महिलांनी 15 ऑगस्ट रोजी समस्या सुटाव्यात, म्हणून उपोषण केले होते. त्यासंदर्भात आपण भेट देऊन व्यथा जाणून घेतल्या. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रश्‍न मांडला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडेही हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर पोलीस वसाहतील पुुरुष शौचालयासाठी दोन लाख 49 हजार 579 रुपये तर महिलांसाठी दोन लाख 49 हजार 613 रुपये निधी मंजूर केला. जिल्हा नियोजन अधिकारी नि. श. भदाणे यांनी स्थानिक विकास निधीतून ही कामे करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
हे काम तात्काळ आणि चांगल्या दर्जाचे करावे, याबाबत आ. कोल्हे यांनी वाकचौरे यांना बुधवारी आदेश केले आहेत. अनेक दिवसापासून प्रलंबित असणांरा प्रश्न मार्गी लागल्यामुळे पोलिस वसाहतीतील रहिवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)