पोलीस लाचेच्या जाळ्यात

पोलीस लाचेच्या जाळ्यात

पुणे,दि. 12- ग्रामीण पोलिस दलातील पौड पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदाराला 3 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
तात्यासाहेब रामचंद्र आगवणे (48, रा. स्वारगेट पोलिस लाईन) असे लाच घेणाऱ्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. आगवणे हे सध्या पुणे ग्रामीण पोलिस दलातील पौड पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. आगवणे यांच्याविरूध्द 26 वर्षीय युवकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार युवकाविरूध्द अदखलपात्र गुन्हयाची (एनसी मॅटर) नोंद आहे. त्या अदखलपात्र गुन्हयात कारवाई न करण्याकरिता पोलिस हवालदार आगवणे यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर तक्रारीची पडताळणी केली. दि. 8 सप्टेंबर रोजी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीत आगवणे हे 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करीत असल्याचे स्पष्ट झाले.

तडजोडीअंती त्यांनी 3 हजार रूपयाची लाच घेण्याचे मान्य केले. लाच लूचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी सापळयाचे आयोजन केले. सरकारी पंचासमक्ष पोलिस हवालदार तात्यासाहेब आगवणे यांनी तक्रारदार युवकाकडून 3 हजार रूपयाची लाच स्विकारली. आगवणे यांना 3 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे विभागाचे पोलिस अधिक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलिस अधिक्षक राजकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय पतंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)