पोलीस मित्र संघटनेच्या वतीने रश्‍मी शुक्‍ला यांचा सत्कार

पिंपरी, दि. 20 (वार्ताहर) – सण, उत्सव व नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे शांतता व सुव्यवस्था राखल्याने पुणे शहर पोलीस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांचा सत्कार करण्यात आला.
चोवीस तासांहून अधिक काम करणारे एकमेव खाते असल्याबाबत त्यांचा सत्कार करण्यात आल्याचे महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी सांगितले. संघटनेच्या पिंपरी-चिंचवड विभागाचे पदाधिकारी सचिन काळे, योगेश विनोदे, प्रकाश डोंगरे, राजू बीडकर, मांगीलाल सोळंकी उपस्थित होते. अध्यक्ष कपोते म्हणाले की, पुण्यातील अनेक तास चालणारी गणपती मिरवणूक, गणेशोत्सव, इद, ख्रिसमस, नवीन वर्षाचा जल्लोष, मराठा आरक्षणासाठी निघालेले भव्य मोर्चे आणि नुकत्याच पार पडलेल्या पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकाच्या निवडणुका या सर्व घटनांमुळे पोलीस दलावर प्रचंड ताण होता. आयुक्‍त आणि सह आयुक्‍त, अतिरीक्‍त आयुक्‍त, सहाय्यक आयुक्‍त, पोलीस निरीक्षक यांनी उत्तम प्रकारे नियोजित व बंदोबस्त केल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. आयुक्‍तांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व जणांनी आपली जबादारी पार पाडली. त्यानुसार संघटनेच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पोलीस दलाकडून उत्तम प्रकारे काम सुरू आहे. त्यामुळे पोलीस दलास सहकार्य करण्यासाठी संघटना कायम पुढे असते. त्याचप्रमाणे पोलिसांच्या समस्या व त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संघटना काम करणार आहे.
– राजेंद्र कपोते, अध्यक्ष, राज्य पोलीस मित्र संघटना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)