पोलीस महिलेला शिवीगाळ : एकास पोलीस कोठडी

पुणे- चारचाकी गाडी बाजूला करण्यास सांगितल्याने कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस महिलेला शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला 3 ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.
सागर निवृत्ती शितोळे (वय 32, रा. हिंजवडी) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार लता बाळीशा अंबरगी (वय 50, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 1 ऑगस्ट 2018 रोजी हिंजवडी परिसरात घडली.
अंबरगी या वाकड रोड येथील एका पेट्रोल पंपासमोर थांबल्या होत्या. त्यावेळ शितोळे याने चारचाकी गाडी मध्येच पार्क केली होती. त्यावेळी गाडी पुढे किंवा मागे घेण्यास अंबरगी यांनी शितोळे याला सांगितले. त्यावेळी “तु इथे पॉईन्टला आहेस का, तुझी नोकरी तू कर’ असे शितोळे म्हणाला. त्यावेळी “माझी नोकरी इथेच आहे म्हणून तर तुझ्या गाडीजवळ आले’ असे अंबरगी म्हणाल्याने शितोळे याने त्यांना शिवीगाळ केली, तसेच “मी गाववाला आहे. मी आमदाराला फोन लावतो, असे म्हणत त्यांना धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमुद केले आहे.
या प्रकरणी शितोळे याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. तर, बचाव पक्षातर्फे ऍड. सुचित मुंदडा यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)