पोलीस-महसूल प्रशासनात दुफळी 

रॉयल्टी भरुनदेखील लिलावधारकाची कोंडी
वाळू कोणाची? महसूल की पोलीस प्रशासनाची?

दहिवडी, दि. 22 (प्रतिनिधी) – माण तालुक्‍यात महसूल विभागाचा भोंगळा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी माण महसूल विभागने जप्त केलेल्या वाळूचा लिलाव केला. त्याची बोलीदेखील चांगल्या पद्धतीने लागली गेली. मात्र, वाळू नक्की कोणाची हेच माण महसूल विभागाला व पोलीस प्रशासनाला माहित नाही. त्यामुळे आठ ते नऊ लाख रॉयल्टी भरूनदेखील वाळू लिलावधारकाला भेटली नाही. महसूल विभागने जप्त केलेल्या वाळूचा ताबा दिला खरा. मात्र, पोलीस प्रशासन लिलाव धारकाला वाळू उचलू देत नाही व गुन्हा दाखल करण्याचा सज्जड दम लिलाव घेणाऱ्याला देत आहे.
त्यामुळे पैसे भरून देखील माण महसूल विभाग लक्ष देण्यास तयार नाही तर पोलीस प्रशासन ताबा देण्यास तयार नाही. त्यामुळे लिलाव धारकाचे लाखो रुपये माण महसूल विभागाकडे अडकून पडले आहेत. लाखो रुपये गौण खनिज भरून घेवून महसूल विभाग काही बोलण्यास तयार नाही तर वाळू कोणाची हे देखील सांगण्यास तयार नाही. या कारणामुळे महसूल व पोलीस प्रशासनात असणारी दुफळी पुन्हा दिसून येत आहे. या ठिकाणी असणारी वाळू महसूल विभागाने जप्त केली होती. त्यावेळी त्याची माहिती ठेवणे गरजेचे होते. मात्र, लिलावावेळी महसूल विभागाने ब्रास वाळूचा लिलाव केला. मात्र, या ठिकाणी ब्रासदेखील वाळू भरली गेली नाही. व पावत्या देखील देण्यात आल्या नाहीत. महसूल विभगात सगळी माहिती असताना देखील याकडे कोणी लक्ष देत नाही तर पोलीस देखील या ठिकाणची वाळू उचलून देत नाहीत. यामुळे लिलाव धारकाचे लाखो रुपये माण महसूल विभागात अडकून पडले आहेत.

-Ads-

सदरची वाळू आम्ही अनेक गुन्ह्यात जप्त केली आहे व हे सर्व गुन्हे न्यायालयीन प्रक्रीयेमध्ये चालू आहेत. त्यामुळे आम्ही ही वाळू महसूल विभागाल दिली नाही. तसेच त्याची कागदोपत्री कार्यवाही अजूनदेखील झाली नाही. त्यामुळे आम्ही वाळू महसूल विभागाला व लिलाव धारकाला देवू शकत नाही.
सपोनि प्रवीण पाटील, दहिवडी पोलीस स्टेशन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)