पोलीस बंदोबस्तात साजरी करण्यात आली वटपौर्णिमा

पिंपळे गुरव – पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, दापोड़ी परिसरात महिलांनी वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. सकाळपासूनच महिलानी नैवद्य तयार करुन व पूजेचे साहित्य घेऊन परिसरातील वडाच्या झाडांचे पूजन केले. दरम्यान यावेळी ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त पहायला मिळाला. साखळीचोरांची भीती परिसरात स्पष्ट जाणवत होती. दरम्यान बंदोबस्त असतानाही महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे प्रकार घडले असल्याची चर्चा दिवसभर या परिसरात सुरू होती.

महिलांचा आवडता सण म्हणून वटपौर्णिमा सणास महत्व आहे. सात जन्मी हाच पती मिळावा याकरिता भारतीय संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे महिलांकडून वटवृक्षाचे पूजन केले जाते. बुधवारी सकाळपासूनच महिला वड पूजनासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. पारंपारिक वेशभूषेत व दागिने परिधान करून आलेल्या महिलांनी मनोभावे वट वृक्षाचे पूजन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोनसाखळी चोरी टाळण्यासाठी सांगवी पोलिसांचे प्रयत्न
वटपौर्णिमेनिमित्त बुधवारी परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात दागिने परिधान करुन वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. वडाचे झाड घरापासून दूर असते. त्यामुळे सोनसाखळी चोरांसाठी ही तर “सुवर्णसंधी’ असते. सोनसाखळी हिसकावण्यासारखे प्रकार घडू शकतात याची जाणीव असल्याने सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस आधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी परिसरातील गस्त वाढवली होती. तसेच सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणच्या प्रत्येक वडाच्या झाडाशेजारी पोलीस कर्मचारी थांबविण्यात आले होते. पोलिसांकडून घेण्यात आलेल्या या महिला सुरक्षितेच्या दक्षतेचे महिलावर्गातून स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)