पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी वहिले

चिंबळी- केळगाव (ता. खेड) येथील युवा उद्योजक युवराज वहिले यांची खेड तालुका पोलीस पाटील संघटनेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. त्यांना नियुक्‍त पत्र महाराष्ट्र राज्य कार्यकारी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे व खेड तालुका पोलीस पाटील महिला संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती मांडेकर यांच्या हस्ते चाकण येथे प्रदान करण्यात आले. याप्रसंगी चिंबळी येथील पोलीस पाटील मयुरी बनकर, साहेबराव रताळे, रवींद्र ठाकुर आदि गावचे पोलीस पाटील उपस्थित होते. युवराज वहिले यांची खेड तालुका पोलीस पाटील संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील कुरुळी, चिंबळी, केळगाव, माजगाव, मरकळ, सोळू, धानोरे, मोशी, डुडूळगाव, मोई, निघोजे परिसरातील पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)